Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: मिठी मारली, अंगावर ब्लँकेट घेतलं अन्...; धावत्या दुचाकीवर जोडप्याचे नको ते चाळे VIDEO व्हायरल

Couple Video Viral: काही व्हिडीओमध्ये दुचाकीवर रोमान्स करतानाचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. अशात आता दुचाकीवर रोमान्स करतानाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Couple Romance On Bike Video:

प्रेमी युगुल कधी काय करतील याचा काहीच नेम नाही. सोशल मीडियावर तरुण तरुणींचे फिल्मीस्टाइल रोमान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात आता थंडीपासून वाचण्यासाठी एका जोडप्याने केलेला जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर कपल्सचे मेट्रो ट्रेन, दुचाकी किंवा रेल्वे स्टेशनवर खुल्लम खुल्ला प्यार करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. यातील काही व्हिडीओमध्ये दुचाकीवर रोमान्स करतानाचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. अशात आता दुचाकीवर रोमान्स करतानाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकी चालवत आहे. तरुणी त्याला समोरुन मिठीत घेत टाकीवर बसलीये. तसेच तिने स्वत:च्या आणि प्रियकराच्या अंगावर ब्लँकेट घेतलं आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. दुचाकीवर बसल्यानंतर तर आणखी जास्त थंडी वाजते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रेमी युगुलाने असा जुगाड शोधलाय.

सोशल मीडियावर @bandrabuzz या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्हुव्ज आले आहेत. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट देखील केल्यात. वांद्रे रेक्लेमेशन येथील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडीओ पोस्ट करत यावर मुंबई पोलिसांना देखील टॅग करण्यात आलं आहे. अशा पद्धतीने अनेक जोडपी वाहतुकीचे नियम मोडतात. त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा प्रेमी युगुलांवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती देखील यावर कॅप्शनमध्ये करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT