Couple caught on camera hugging while riding a moving bike in Firozabad viral video sparks public outrage Saam Tv
व्हायरल न्यूज

धावत्या बाईकवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स; VIDEO पाहून लोक म्हणाले, ''थोडं तरी शहाणपण ठेवा''

Moving Bike Romance: उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे धावत्या बाईकवर कपलचा बेधडक रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला. या धोकादायक कृत्यावर सोशल मिडियावर संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

Tanvi Pol

Couple Stunt Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक पण तितकाच संतापजनक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका धावत्या बाईकवर बसलेलं कपल एकमेकांमध्ये इतकं गुंतलेलं दिसतं की, ते रस्त्यावरील इतरांची आणि स्वतःच्या सुरक्षेचीही पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अनेकांनी या कृत्याची टोकाची निंदा केली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, एका तरुण रात्रीच्या वेळेस हायवेवर बाईक चालवत असतो आणि बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर एक तरुणी झोपलेली आहे. दोघंही अगदी प्रेमात गुंग असल्यासारखे वागताना दिसतात. परंतु ही कृती केवळ सार्वजनिक जागेत गैरवर्तन आहे असं नाही, तर अत्यंत धोकादायकही आहे. दोघांचा हा संतापजनक प्रकार त्याच रोडवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. रस्त्यावर वर्दळ असताना अशा प्रकारे निष्काळजीपणाने बाईक चालवणं हा इतरांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगितले जात असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने कमेंट केली,''थोडं तरी शहाणपण ठेवा''. तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''प्रेम करा, पण अक्कलही वापरा'',तिसऱ्या यूजरने म्हटलं,'' हे प्रेम नाही, हा मूर्खपणा आहे'' अशा कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. काहींनी तर थेट पोलिसांना टॅग करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अलीकडच्या काळात धावत्या गाडीवर स्टंट(Stunt), रोमान्स किंवा मोबाईल वापरणं यासारख्या घटनांची संख्या वाढत आहे. काही व्हिडीओज तर असं सूचित करतात की, हे ठरवून शूट करण्यात आलेले असतात, म्हणजेच केवळ व्ह्यूजसाठी इतरांचा जीव धोक्यात घालणं हे उद्दिष्ट असतं. हे अत्यंत चिंताजनक आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT