Romantic Accident Saam TV
व्हायरल न्यूज

Romantic Accident: अपघात पण काय रोमँटीक झालाय; व्हिडीओ पाहून हसून हसून तुमचंही पोट दुखेल

Romantic Accident Viral Video: कारचा पत्रा तुटल्याने वेगळाच आकार तयार झालाय. याचाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video:

आजवर अपघाताच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेत. यातील काही अपघात काळजाचा थरकाप उडवणारे असतात. तर काही अपघात पाहून पोट दुखेपर्यंत हसू येतं. काही अपघाताच्या व्हिडीओ चित्तथरारक आणि आश्चर्यकारक देखील असतात. आसाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चारचाकी कारला मागून दुसऱ्या एका वाहनाने धडक दिलीये. मागून धडक बसल्याने कार थोडी चेपली आहे. कारचा पत्रा तुटल्याने तिथे वेगळाच आकार तयार झालाय. याचाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

अपघातामुळे चेपलेल्या भागाचा आकार एखाद्या कपल सारखा दिसतोय. एखादं जोडपं जणू काही कीस करत आहे, असा आकार कारवर तयार झाला आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट केल्यात.

एकाने लिहिलंय की, बघरणाऱ्याला नजर हवी ती तुमच्यावरच्या एक्या वाक्यामुळे बरोबर जाते. भारतीय लोकांमधे खूप कुटून कुटून टॅलेंट भरलेलं आहे. फक्त ते नको तिथे दिसून येतं, असंही एकाने लिहिलं आहे.

@marathi_jokes_official या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या पोस्टला २ लाखांहून अधिक लाइक्स मिळालेत. सोशल मीडियावर असे विविध आकाराचे बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकांना नारळात गणपती किंवा दुसऱ्या कोणत्याही भाजीला सोंड असल्याचं पाहायला मिळतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

Marathi Ukhane: लग्नात नववधुसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे

MMS Viral: १९ मिनिटांच्या व्हिडीओतील तरुणीची आत्महत्या? VIDEO मुळे सोशल मीडियावर खळबळ; नेमकं सत्य काय?

धार्मिक भावना दुखावल्याने अभिनेता गोत्यात; रणवीर सिंहच्या विरोधात पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT