CCTV Footage Saam Digital
व्हायरल न्यूज

CCTV Footage : भरधाव कारची बाईकला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, थरारक घटनेचा VIDEO आला समोर

Greater Noida Accident CCTV VIDEO: ग्रेटर नोएडा येथे एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात आलेल्या कारने एका दुचाकीस्वार चालकाला जोरदार धडक दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Noida News

ग्रेटर नोएडा येथे एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात आलेल्या कारने एका दुचाकीस्वार चालकाला जोरदार धडक दिली आहे. या घटनेत दुचाकीस्वार लांब फेकला गेल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.ज्यामध्ये या संपूर्ण भीषण अपघाताची घटना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडू शकतो. कारण कारने धडक दिल्यानंतर दुचाकी चालक हवेत उडून नंतर दूर पडताना दिसत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील इकोटेक जंगल परिसराती हा भीषण अपघाताची घटना घडलेली असून ही घटना १३ फेब्रुवारीच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. दुचाकी चालकाचे नाव पवन असे आहे.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांना कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि दुचाकी चालकास रुग्णालयात नेले परंतू तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत दुचाकी चालकाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असून सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे.

सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवरील @lavelybakshi या अकाउंटवर संबंधित अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे रस्त्यावर काहीच वाहन दिसून येत नाहीत. त्यातच हा दुचाकीस्वार आपल्याला येताना दिसतो मात्र काहीवेळानंतर दुचाकी चालक रस्ता ओलांडू लागले असता जसा पुढे जातो त्याच क्षणाला एक भरधाव वेगात कार येते आणि दुचाकीस्वाराला कारची जोरदार धडक बसते. दुचाकीला कारची धडक बसताच दुचाकीस्वार साधारण १० चे ५० मीटक अंतरावरुन जाऊन खाली पडतो. ही सर्व घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT