CCTV Footage: लाठ्या-काठ्या आणि फावड्याने २ तरुणांना अमानुष मारहाण; काळजाचा थरकाप उडवणारी घटना, VIDEO

Chhattisgarh News: लाठ्या-काठ्यांसह दोन व्यक्ती अन्य दोघांना मारहाण करतायत. या अमानुष मारहाणीच्या घटनेत एकाचा मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी आहे.
CCTV Footage
CCTV FootageSaam TV
Published On

Chhattisgarh Crime CCTV Footage:

छत्तीसगडमधील बिसालपूर येथून काळीज सून्न करणारी एक थरारक घटना समोर आली आहे. दोन तरुणांना विचित्र पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. लाठ्या-काठ्यांसह दोन व्यक्ती अन्य दोघांना मारहाण करतायत. या अमानुष मारहाणीच्या घटनेत एकाचा मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

CCTV Footage
Crime News : धक्कादायक ! नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रयत्न, एकास पाेलिसांनी घेतलं ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटना बिलासपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खमतराई हाऊसिंग बोर्ड कॉलनीमधील रस्त्यावर १४ फेब्रुवारीच्या रात्री घडली आहे. ही संपूर्ण घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण हातात फावडे घेऊन उभा आहे आणि जमिनीवर पडलेल्या एका व्यक्तीवर वार करत आहे. पीडित व्यक्तीच्या शरीराची कोणत्याही प्रकारे हालचाल होत नाहीये.मात्र तरी देखील नराधम तरुण त्याच्यावर वार करत आहे. काही अंतरावर आणखी एक पीडित व्यक्ती खाली झोपलेला आहे. त्याच्या जवळही एक व्यक्ती हातात काठी घेऊन उभा आहे. दुसरा पीडित हालचाल करत असल्याने हे दोघेही मिळून त्याला क्रूरतेने मारहाण करतात.

त्याचा मृत्यू किंवा शरीराची हालचाल बंद होईपर्यंत दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे. घटनेचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पंकज उपाध्याय आणि त्याचा मित्र कल्लू एकत्र मोटारसायकलवरून घरी जात असताना मेन रोडवरील गोपी सूर्यवंशीसोबत त्यांचा वाद झाला.

या भांडणामुळे तिलकेश उर्फ ​​सल्लू सूर्यवंशी, रुपेश शुक्ला, शिव शुक्ला, गोपी सूर्यवंशी आणि अन्य एका अल्पवयीन मुलागा यांनी एकत्र येत दोघांच्या हत्येचा कट रचला. दोघांना मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. कल्लूची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र पंकजला यामध्ये मृत्यू झालाय.

पोलिसांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या पाच जणांना अटक केली आहे. ​​सल्लू सूर्यवंशी, रुपेश शुक्ला, शिव शुक्ला, गोपी सूर्यवंशी आणि अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केलीये. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत 147 (दंगल), 148 (प्राणघातक शस्त्राने दंगल), 149 (बेकायदेशीर सभा), 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 302 (हत्या) यासह आरोप दाखल करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com