Bull Fight on Railway Tracks Saam Tv
व्हायरल न्यूज

Bull Fight Viral Video: बैल जोमात, रेल्वे यंत्रणा कोमात! रेल्वे ट्रॅकवर बैलांची झुंज; पाहा व्हिडिओ

Bull Fight on Railway Tracks: तुम्ही बैलांच्या झुंजीबद्दल ऐकलं असेल, गावाकडे बैलांची झुंजही पाहिली असेल. मात्र रेल्वे ट्रॅकवर कधी बैलांचा राडा पाहिलाय का? नक्की नाही, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अशी झुंज, ज्यापुढे रेल्वेची यंत्रणाही हतबल झाली.

Mayuresh Kadav

बैलांची झुंज तशी आपल्यासाठी नवीन नाही. कधी भर रस्त्यात तर कधी झुंजीच्या मैदानात बैल एकदा भिडले की त्यातून माघार नाही. बऱ्याचदा या दोन बैलांच्या झुंजीचा फटका माणसांनाही बसतो. मात्र यावेळी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. दोन बैलांमध्ये झुंज लागली आणि अख्खी रेल्वे यंत्रणाच ठप्प झाली. याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ दिसत आहे की, दोन बैल कसे आपसांत भिडले आहेत. एक्स्प्रेस ट्रेन जाणार असल्यानं गेटमननं फाटक बंद केलंय. मात्र फाटकात हे दोघं आमने सामने आले आणि तिथच सुरू झाला राडा. ट्रेन यायची वेळ झाल्यानं गेटमननं त्यांना तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र या बैलांनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तितक्यात तिथे ट्रेन आली. पण माघार घेतील ते बैल कसले.

त्यांनी आता थेट रेल्वे ट्रॅकवर येत लोकोपायलटलाच आव्हान दिलं. लोको पायलट हॉर्न देत होता. दुसरीकडे गेटमननेही बैलांना हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. एव्हाना अवती भोवती गर्दी गोळा झाली. कुणी ही झुंज कॅमेऱ्यात कैद करत होतं, तर कुणी रेल्वे प्रशासनाची हतबलता पाहत होतं.

अखेर या बैलांना रेल्वेची दया आली आणि तुला बघून घेईन, अशी एकमेकांना दटावणीची भाषा करत त्यांनी रेल्वेला वाट मोकळी करून दिली. हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र सोशल मीडियात या व्हिडीओवरून कमेंटचा पाऊस सुरूंय. अनेकांनी या बैलांच्या झुंजीवरून रेल्वे प्रशासनाची चांगलीच खिल्ली उडवलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT