Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : नवरीचा नादच खुळा! थेट केसांमध्ये बॅटरी लपवून बाशिंगला लावली लाईट, VIDEO व्हायरल

Bride Lighting in Bashing Vira Video : सुंदर कानातले आणि विविध दागिन्यांसह तिने चेहऱ्यावर देखील भरपूर मेकअप केला आहे. आता या सर्वांची काय कमी होती, ते या नवरीने डोक्याला थेट लाईटींगवालं बाशिंग बांधलं आहे.

Ruchika Jadhav

प्रत्येक तरुणी आपल्या आयुष्यात नवरी होण्याचं स्वप्न पाहत असते. शक्यतो आयुष्यात एकदाच लग्न होतं. या दिवशी प्रत्येक मुलगी महागडे अलंकार आणि सुंदर साडी परिधान करते. आता फॅशनमध्ये इतका बदल झाला आहे की कोण कधी काय करेल याचा कही नेम नाही. असाच एका नवरीच्या अतरंगी फॅशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका नवरीबाईने मराठमोळा लूक केलाय. लग्नासाठी तिने नऊवारी साडी नेसलीये. सुंदर कानातले आणि विविध दागिन्यांसह तिने चेहऱ्यावर देखील भरपूर मेकअप केला आहे. आता या सर्वांची काय कमी होती, ते या नवरीने डोक्याला थेट लाईटींगचं बाशिंग बांधलं आहे.

लग्नाला फुलांचे हार आणि बाशिंग बांधले जातात. आधी चाफ्याच्या फुलांचे, मोगऱ्याच्या फुलांचे बाशिंग असायचे. यात आता नवीन विविध फॅशन आल्या आहेत. काही ठिकाणी सफेद मन्यांचे बाशिंग आहेत. तर काही जण हिऱ्यांचे बाशिंग देखील बांधतात. आता या तरुणीने देखील ट्रेडिश्नल स्टाईल डोक्यावर तुरा असलेलं बाशिंग बांधलं आहे.

डोक्यावर तुरा असलेल्या या बाशिंगमध्ये नवरीने ट्वीस्ट आणत त्याला लाईटींग केली आहे. तिने थेट केसांच्या हेअरस्टाईलमध्ये एक बॅटरी लपवली आहे आणि त्या बॅटरीच्या सहाय्याने बाशिंगला लाईटींग केलीये. लग्नाच्या धावपळीत नवरीने हटके दिसण्यासाठी केलेला हा जुगाड आता चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर @richas_makeover05 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत यावर "तुम्ही पाहिले का कधी लाईट वालं बाशिंग, मी तर पहिल्यांदाच पाहिलं", असं कॅप्शन लिहिलं आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांना नवरीने केलेला हा जुगाड चांगलाच आवडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Mucchal: स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याचे शिक्षण किती झालंय?

Maharashtra Live News Update : विजय सत्याचाच होतो, असत्याचा नाही - पंतप्रधान मोदी

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

SCROLL FOR NEXT