Viral Wedding Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरीबाईचा स्वॅग भारी, थेट स्पोर्ट्स बाईकवरुन दमदार एन्ट्री; भन्नाट व्हिडिओ व्हायरल

Viral Wedding Video: हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नवरीची हटके एन्ट्री. चक्क स्पोर्ट्स बाईकवरुन मारलेल्या भारी एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Gangappa Pujari

Viral Wedding Video:

सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न सोहळ्यातील विविध गमती जमतींचे व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमधील नवरीच्या हटके एन्ट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, जाणून घ्या सविस्तर.

लग्न म्हणजे (Wedding) दोन जिवांचा संगम. लग्नात नवरा अन् नवरीकडे सर्वांचे लक्ष असते. लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी, गमती- जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.

कधी नवरा- नवरीच्या जबरदस्त एन्ट्रीची, कधी डान्सची, तर कधी पाहुण्यांमध्ये जुंपलेल्या भांडणांची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नवरीची हटके एन्ट्री. चक्क स्पोर्ट्स बाईकवरुन मारलेल्या भारी एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, गाडीवरील बंगाली तरुणी साडी, दागिने घालून नववधूच्या पेहरावात दिसत आहे. ही तरुणी अगदी कुशल रायडरप्रमाणे इतकी मोठी स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहे. ही तरुणी काजल दत्ता असे या तरुणीचे नाव असून ती बंगालमधील एक रायडर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या या कौशल्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT