BoyFriend Caught Inside Cooler Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेमासाठी कायपण! तरुणीने बॉयफ्रेंडला चक्क कुलरमध्ये लपवलं; तरीही घरच्यांना सापडला अन्.. VIDEO

BoyFriend Caught Inside Cooler Viral Video: या चोरी- चोरी चुपके चुपके भेटीचा घरच्यांना सुगावा लागला अन् दोघांचीही फजिती झाली.

Gangappa Pujari

Rajasthan Couple Viral Video News:

प्रेमासाठी कायपण! म्हणत एकमेकांसाठी जीव द्यायलाही तयार असणारी अनेक कपल तुम्ही पाहिली असतील. जगाची पर्वा न करता प्रेम करुया खुल्लमखुल्ला म्हणत ही जोडपी एकमेकांना गुपचूप भेटत असतात. घरच्यांचा डोळा चुकवून आपली लवस्टोरी खुलवत असतात. परंतु एकदिवस त्यांच्या या सिक्रेट लवस्टोरीचा भांडाफोड होतोच. सध्या राजस्थानमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ आहे, राजस्थानमधील (Rajasthan) लैला- मजनुचा. घरी कोणी नसल्याचे पाहून गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला बोलावले. मध्यरात्री हा हिरो आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला तिच्या घरी दाखल झाला. परंतु त्यांच्या या चोरी- चोरी चुपके चुपके ठरलेल्या भेटीचा घरच्यांना सुगावा लागला .

घरच्यांना बॉयफ्रेंड आल्याची माहिती मिळाली हे समजल्यावर तरुणीने त्याला चक्क कुलरमध्ये लपवलं. तरीही घरच्यांनी त्याला शोधून काढले अन् चांगलाच राडा झाला. अगदी चित्रपटात घडावा अशा या स्टोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, मुलीच्या घरचे खोलीत लपलेल्या बॉयफ्रेंडचा घरात शोध घेत आहेत. व्हिडिओमध्ये एक महिला घरात शोधाशोध करताना दिसत आहे, ज्यावरुन हे गुपचूप भेट घेणारे दोघेही विवाहित असल्याचे दिसून येत आहे. अचानक मुलीचा बॉयफ्रेंड कुलरमधून बाहेर येतो आणि सर्वांनाच धक्का बसतो. या प्रकारानंतर घरात चांगलीच भांडणे लागल्याचेही पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी गर्लफ्रेंड असावी तर अशी.. असे म्हणत मुलीचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी असल्या उचापती करायच्याच कशाला? असा सवालही विचारला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT