Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: माझा शर्ट सोड,नाहीतर आई ओरडेल! वाघासमोरही आईची दहशत; चिमूकल्याचा VIDEO एकदा पाहाच

Viral News In Zoo: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघाच्या तोंडात एका मुलाचा शर्ट अडकलेला दिसतो. मुलगा वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी विनंती करत आहे.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघाने एका मुलाच्या शर्टाला पकडलेले दिसते. मुलगा घाबरलेला असून वाघाला शर्ट सोडण्यासाठी विनंती करत आहे. शर्ट फाटला तर घरी आई रागवेल असे तो गयावया करत म्हणत आहे. पिंजऱ्याबाहेर उभे असलेले लोकही ही परिस्थिती पाहत आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वाघाच्या तोंडात शर्ट अडकल्याने मुलगा मदतीसाठी ओरडतोय. हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये एक मूल वाघाच्या तोंडात अडकलेल्या त्याच्या शर्टामुळे घाबरलेले दिसत आहे.

मुलगा वारंवार मदतीची याचना करताना वाघाला विनंती करतो, माझा शर्ट सोडून दे, जर शर्ट फाटला तर आई माझ्यावर ओरडेल. तो रडत-ओरडत वाघाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठे आणि कधी शूट झाला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तसेच, मुलाचा शर्ट वाघाच्या तोंडात कसा अडकला हेही स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओने लोकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, मुलाची प्रतिक्रिया अप्रतिम आहे. वाघाने शर्ट पकडल्यानंतरही त्याला आईचा राग अधिक भीतीदायक वाटतो. दुसऱ्याने टिप्पणी केली की, वाघापेक्षा मुलाला आईच्या ओरडण्याची भीती जास्त आहे. काहींनी मात्र व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर नाराजी व्यक्त केली, मुलाला मदत करण्याऐवजी तो फक्त शूट करत होता. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT