Racing Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Racing Video: अर्रर्र! बाईक वर उडाली अन् गर गर फिरली, पोर्शे कारसोबत रेसिंग करणं तरूणाला पडलं महागात; VIDEO व्हायरल

Bike Rider Racing With Porsche Car Video: सध्या पोर्श कार चांगलीच चर्चेत आली आहे. एक दुचाकीस्वार पोर्शे कारसोबत रेस करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

पुण्यात झालेल्या भीषण अपघातानंतर पोर्श कार चांगलीच चर्चेत आली आहे. असाच पुन्हा एक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार पोर्शे कारसोबत रेस करत असल्याचं दिसत आहे. परंतु महामार्गावर भरधाव वेगात असताना त्याची बाईक हवेत उडते गर गर फिरते अन् तो तरूण खाली पडल्याचं दिसत आहे. पोर्शे कारसोबत रेसिंग करणं तरूणाच्या अंगलट आलं आहे.

सोशल मीडियावर रेसिंगचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक दुचाकीस्वार तरूण पोर्शे (Porsche) कारसोबत रेस करत आहे. पोर्शे कारसोबत रेसिंग चालवताना त्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे, कारण त्याचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटाच येतो. प्रसिद्ध होण्यासाठी लोक जीवही धोक्यात घालताना दिसत (Racing Video) आहे. परंतु अनेकदा असं कृत्य जीवघेणं देखील ठरू शकतं.

हा व्हिडिओ क्रेझी क्लिप्स ओन्ली या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओला आतापर्यंत नऊ मिलियन व्ह्यूज देखील मिळाले आहेत. दुचाकीस्वार पोर्शे कारसोबत रेस करताना सापडलं, असं कॅप्शन या व्हिडिओला (Accident Video) देण्यात आलं आहे. अनेक लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लोकांनी असा मूर्खपणा करू नये, यामुळे जीवही जाऊ शकतो तर दुसऱ्याने दुसऱ्याचा जीव घेऊ शकतो असं म्हटलं आहे.

पुण्यात नुकतंच पोर्शे कार चालवत एका अल्पवयीन मुलानं दोन लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोर्शे कारची सध्या चांगलीच चर्चा देखील होत आहे. आता पुन्हा पोर्शे कारसोबत रेसिंगचा व्हिडिओ (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. या अपघातामध्ये तरूणाच्या दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे. महामार्गावर दुचाकीचे भाग पडलेले असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT