उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद येथील इंडियन बँकेच्या शाखेत दोन बँक कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये बँकेच्या शाखा व्यवस्थापकानं सहाय्यक शाखा व्यवस्थापकाला ग्राहकांच्या समोरच मारहाण केली. या दोघांमध्ये आधी बाचाबाची झाली. बँक मॅनेजर त्यानंतर माघारी फिरला. पण अचानक त्याची सटकली आणि त्याने मागे वळून थेट सहायक व्यवस्थापकाच्या कमरेत लाथ घातली. लाथ इतक्या जोरात होती की तो अधिकारी जमिनीवरच कोसळला.
सीसीटीव्हीत कैद झाली संपूर्ण घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 6 ऑक्टोबर रोजी नजीबाबाद येथील इंडियन बँकेच्या शाखेत घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक अधिकारी आपल्या सहकारी अधिकाऱ्याच्या कमरेत जोराने लाथ मारताना दिसत आहे. लाथ जोरानं लागल्यानं तो अधिकारी थेट जमिनीवर कोसळला. हा सगळा प्रकार ग्राहकांच्या डोळ्यांसमोर घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आता त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय आहे प्रकरण?
बँकेतील असिस्टंट ब्रँच मॅनेजर हा रजेवर होता. पण ६ ऑक्टोबरला एका तक्रारीच्या संदर्भात चौकशीसाठी तो बँकेच्या शाखेत आला होता. त्यावेळी मॅनेजर आणि त्याच्यात वाद झाला. काही वेळाने शाब्दिक चकमक झाली. त्याचं पर्यावसन मारहाणीत झालं. मॅनेजरनं उद्धट वागणूक दिली. तसंच असभ्य वर्तन केलं. तसेच जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचा आरोप मारहाण झालेल्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरनं केला.
बदली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
याबाबत त्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरनं पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ब्रँच मॅनेजरने त्यांना जीवे मारण्याची आणि चेन्नईला बदली करण्याची धमकी दिली. बँकेत नियमांच्या बाहेर जाऊन काम करण्यास नकार दिल्याने त्यांना सतत त्रास दिला जात होता आणि त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या जात होत्या. या धमकीशी संबंधित काही ऑडिओ रेकॉर्डिंग देखील असल्याचे त्याने सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची पडताळणी केलेली नाही.
बँक अधिकाऱ्याला मारहाण महागात पडणार
या प्रकरणी 7 ऑक्टोबरला नजीबाबाद पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्यानं बँच मॅनेजरविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला. नजीबाबाद पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.