Bihar Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Bihar Viral Video: भरदिवसा फिल्मी स्टाईल ड्रामा! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरात घुसून तरुणीला पळवले; पाहा व्हिडिओ...

Araria Viral Video: हा सगळा प्रकार गावातील अनेकजण पाहत होते. मात्र त्या तरुणांना आडवण्याची हिंमत झाली नाही.

Gangappa Pujari

Bihar Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा अंगावर काटा उभा राहतो. सध्या बिहारमधील एका घटनेचा असाच एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

या व्हिडिओमध्ये एका तरुणीला गाडीवर बसवून भर दिवसा पळवून नेल्याचे दिसत आहे. भरदिवसा रंगलेल्या या फिल्मी स्टाईल थराराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य, चला जाणून घेवू....

बिहारमधील अररिया (Bihar Arriya) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या भावांनीच हे कृत्य केले असून या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे. ज्यावर नेटकरीही चकित झाले आहेत.

नवरी मुलगी ओरडत होती, किंचाळत होती तरीही त्या तरुणांनी तिला तिच्या सासरच्या घरातून पळवून नेले. हा सगळा प्रकार गावातील अनेकजण पाहत होते. मात्र त्या तरुणांना आडवण्याची हिंमत झाली नाही. आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पीडित मुलीच्या सासरच्या लोकांनी ऑनर किलिंग अंतर्गत मुलासह सूनेची हत्या करण्याची भीती व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, फारबिसगंज एसडीपीओ खुशरू सिराज आणि पोलीस कर्मचारी नंदकिशोर नंदन यांनी तातडीने कारवाई करत मुलीला ताब्यात घेतले आहे.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिहारमध्ये काहीही होवू शकते असे म्हणत काही जणांनी संताप व्यक्त केला आहे तर काही जणांनी तरुणांवर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT