Python Snake Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Python Snake Viral Video: विशाल अजगराने महिलेला विळखा घातला अन्...; पुढे जे घडलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल

Python Snake Video: अजगर आता महिलेला खाणार की काय असा भास हा व्हिडीओ पाहून होतोय.

Ruchika Jadhav

Dangerous Python Snake:

सोशल मीडियावर सापाचे आजवर अनेक भयंकर व्हिडीओ व्हायरल झालेत. सापापेक्षा अजगराला नुसतं पाहून देखील अनेकांचा श्वास थांबतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडीओ पाहून तुम्हालाही श्वास रोखल्या सारखे वाटेल. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने विशाल महाकाय अजगर उचलून घेतला आहे. अजगराने महिलेला मोठा विळखा घातलाय. अजगर आता महिलेला खाणार की काय असा भास हा व्हिडीओ पाहून होतोय. मात्र महिला अजगरामुळे जराही घाबरलेली नाही.

नुसतं साप पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो मात्र महिला हसत हसत अजगराशी खेळत आहे. महिलेचा अजगरासोबत खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. @Snakesrealm या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केलाय. अनेकांनी यावर भीती व्यक्त केलीये. तर काहींनी महिलेची काळजीही व्यक्त केली आहे. ज्युलिएट ब्रुअर असं या महिलेचं नाव आहे. महिलेचे सरपटणाऱ्या प्राण्यांसोबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत.

ही महिला सरपटणाऱ्या प्राणी प्राणीसंग्रहालयात काम करते. या प्राणीसंग्रहालयात सर्व प्रकारचे सरपटणारे प्राणि आहेत. यामध्ये मगर, पाल, सरडे असे अनेक प्राणी आहेत. या प्राण्यांसोबतचे महिलेने बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेत. सामान्य माणसांना असे व्हिडीओ पाहून काळजात धडकी भरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

SCROLL FOR NEXT