Saam Tv
व्हायरल न्यूज

चक्क ९० अंशाच्या काटकोनात ब्रीज; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Bhopal 90 Degree Viral Bridge: सोशल मीडियावर सध्या एका पुलाची तुफान चर्चा रंगली आहे. ज्यात तयार झालेल्या पुलाचे वळण पाहून प्रत्येकजण हैराणही झालेला आहे. नक्की काय घडले ते तुम्ही व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

90 Degree Viral Bridge: ध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अलीकडेच तयार झालेला एक उड्डाणपूल सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या पुलाची रचना पाहून एकीकडे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर या पुलाचे मीम्स तुफान वेगाने व्हायरल होत आहेत. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सुरक्षेचे निकष पाळले आहेत का, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्व सोशल मीडिया माध्यमांवर या पुलाचा व्हिडिओ तुम्ही पाहु शकता.

९० डिग्री वळणाचा ब्रीज पाहून नेटकरी थक्क

नरेला भागात इंजिनिअर विश्वास सारंग यांच्या देखरेखीखाली बांधलेला असा हा पूल(bridge) आहे. जो सरळ न जाता थेट ९० अंशात वळतो. छोट्या नाल्या आणि गल्ल्यांमधील कामांसाठी फोटो काढणारे सारंगजी एवढ्या मोठ्या पुलाच्या डिझाइनकडे दुर्लक्ष कसे करू शकतात? की त्यांनी जाणूनबुजून हे दुर्लक्ष केलं? ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर ही लुटमारी आणि भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण आहे असे म्हणण्यात येत आहे.

भोपालमधील या पुलाबाबत सोशल मीडियावर मीम्सही प्रचंड व्हायरल होत आहेत. एमपी काँग्रेसने या पुलावर एक मजेशीर मीम शेअर करत लिहिलं आहे, "हे आहे अजब-गजब मध्यप्रदेशात बांधलेलं जगाचं आठवं आश्चर्य! भोपाळला आलातच तर नक्की पाहा. सध्या तरी मोफत आहे, पण सरकार ज्या वेगाने कमाईचे मार्ग शोधतेय, उद्या यासाठी तिकीटही लागू शकतं''

सोशल मीडियावर रंगली चर्चा

भोपाळमधील हा व्हिडिओ(Video) काही तासांपासून एक्स(ट्वीटर), इन्स्टाग्राम, फेसबूक अशा प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नेटकरी वर्गातून यावर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''काय बोलाव...बोल्ल तरी वाद होतील'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पत्ता द्या त्याचा सत्कार करु'' अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Rule: EPFO च्या नियमात मोठा बदल! पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

Ambernath : एका चुकीमुळे तरुणाला जीव गमवावा लागला, ते इंजेक्शन घेतलं असतं तर...

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Railway Mega Block : 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Diwali 2025 : देशभरात धनतेरसचा उत्साह! सुवर्ण, चांदी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी |VIDEO

SCROLL FOR NEXT