Man Chasing Woman Car Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरूणीच्या कारचा पाठलाग, हुल्लडबाज तरूणांचा भररस्त्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न , VIDEO समोर

Man Chasing Woman Car Video: बेंगळुरूमध्ये भररस्त्यात तरुणीला पाठलाग करत घाबरवण्याचा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

Bengaluru Viral Video News

बेंगळुरूमधील कोरमंगला पोलीस स्टेशन परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे . दुचाकीवरून आलेल्या हुल्लडबाज तरूणांच्या टोळक्याने कारमधील दोन महिलांचा पाठलाग (Man Chasing Woman Car Video) करून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी यातील काही हुल्लडबाज तरूणांना ताब्यात घेतलं आहे. (latest accident news)

ही घटना ३१ मार्चच्या रात्री घडल्याचं समोर आलं आहे. ३१ मार्चच्या रात्री एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या दोन महिला कारमधून जात होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या कारचे इंडिकेटर चालू (Viral Video News) केलं. मात्र , त्यांची कार इंडिकेटरच्या विरुद्ध दिशेने वळवल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावरून २ ते ३ दुचाकीवरून आलेल्या ४ ते ५ दुचाकीस्वारांची महिलांसोबत बाचाबाची झाली. हा वाद जास्त टोकाला गेला. या टवाळखोर तरूणांनी या महिलेच्या कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न (Viral Video) केला. ती महिला घाबरून ओरडू लागली. तिने गाडी आणखी वेगाने पळवली.

आरोपींनी महिलांचा पाठलाग करत त्यांना चांगलंच धमकावलं आहे. या महिलांनी ११२ क्रमांक डायल करून पोलिसांना त्यांच्या वाहनाच्या ठिकाणाची माहिती (Bengaluru Viral Video News) दिली. पोलीस आल्यानंतर काही दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झालेत. यातील तीन आरोपींना माडीवाला पोलिसांनी अटक केली आहे. ते या घटनेची चौकशी करत आहेत. याप्रकरणी कोरमंगळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बेंगळुरूमध्ये भररस्त्यात तरुणीला पाठलाग करत घाबरवण्याचा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (crime) आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये चांगलंच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT