Viral Beed Story 
व्हायरल न्यूज

Beed : जावयाचा सोन्याचा 'धोंडा' मांजराच्या पोटात, नेमकं काय झालं? पाहा व्हिडिओ

बीड जिल्ह्यातील एक अनोखी घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. जावयासाठी पीठाच्या गोळ्यात लपवून ठेवलेली सोन्याची अंगठी मांजराने गिळल्याने मोठी पंचायत झाली. अखेर अंगठी मिळाली, पण या घटनेचा शेवट अत्यंत धक्कादायक ठरला.

Namdeo Kumbhar

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही

धोंड्याच्या महिन्यात जवाई सासरवाडीला गेला. मात्र जावयाला मिळालेलं सोन्याचं गिफ्ट मांजरीच्या पोटात गेल्यानं नेमकी कशी गंमत झालीय. याची चर्चा सगळ्या सोशल मीडियावर सुरू झाली. नेमकं हे प्रकरण काय आहे? स्पेशल रिपोर्टसमधून जाणून घेऊयात...

धोंड्याच्या महिन्यात एक जावाई जेवढा नटला तेवढाच ईटला.एका मांजरानं जवायाचा करेंट कार्यक्रम केलाय. जावायाला आनलेली सोन्याची अंगठी मांजरानच गिळली अन् पंचायत झाली.

त्याचं झालं असं समस्थ जावाईबापू संघटना सध्या सासरवाडीच्या मार्गावर हाय. त्यात धोंड्याचा महिना. पोटभर जेवण.. तोंडभर कौतुक अन् बोटभर सोन्याचा एखादा दागिना. हिच काय ती अशा पण बीडच्या टाकरवण गावात जावायाची झाली निराशा..

जेवणाच्या कार्यकाचं आमत्रण मिळताच जावाई - बायकूला घेवून थेट सासरवाडीत हजर जेवण झालं. सरप्राईज म्हणून पीटाच्या गोळ्यात अंगठी ठेवलं. पण मांजरानं थेट पिटाचा गोळाच खाल्ला. अन् पोटात गेली सोन्याची अंगठी. झाली का नाय पंचायत...

शेवटी मांजराला बांधलं.डॉक्टरकड नेलं. उलटीची औषधं दिली. मांजार काय अंगठी पोटातनं बाहेर काढना...शेवटी मांजार मेलं. ऑपरेशन केलं अन् अंगठी बाहेर काढली..

ऑपरेशन अंगठी अंतर्गत मांजर धारातीर्थी पडलं जावायाला अंगठी मिळाली खरी.हिरमुसलेला जावाई परत हारकला.पण अंगठीच्या नादात बिचाऱ्या मांजराचा जीव गेला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT