The viral image claimed to be of Baramati plane crash pilot Captain Sumit Kapoor was found to be misleading after fact-check. Saam Tv
व्हायरल न्यूज

विमान अपघातातील वैमानिकाचा फोटो व्हायरल, कॅ. सुमीत कपूर यांचा फोटो असल्याचा दावा

Fact Check: बारामती विमान अपघातानंतर सोशल मीडियात कॅप्टन सुमीत कपूर यांच्याबाबत उलट सुलट चर्चा रंगतीय. अशातच त्यांचा एक फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. साम टीव्हीनं व्हायरल होत असलेल्या फोटोची पडताळणी सुरू केली,

Saam Tv

बारामती विमान अपघातानंतर सोशल मीडियात चर्चांना उधाण आलंय. नेटीझन्स या अपघाताशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करतायेत. अशातच या विमानाचे पायलट कॅ.सुमीत कपूर यांचाही एक फोटो व्हायरल होतोय. मात्र अनेकांनी हा कॅ.सुमीत कपूर यांचा फोटो नसल्याचा दावा केलाय. या फोटोवरून नेटीझन्समध्ये गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे व्हायरल फोटो कॅ.सुमीत कपूर यांचा आहे की आणखी कुणाचा? असा सवाल उपस्थित होतोय. साम टीव्हीनं या फोटोची पडताळणी केली, मात्र त्याआधी व्हायरल पोस्टमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूयात..

व्हायरल मेसेज

बारामती विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय. अनुभवी पायलट कॅ.सुमित कपूर यांनी दाखवलेलं शौर्य व्यर्थ गेलं.

या पोस्टसोबत कॅप्टन सुमीत कपूर आणि शांभवी पाठक यांचा फोटोही व्हायरल करण्यात आलाय. मात्र अनेकांनी हा फोटो सुमीत कपूर यांचा नसल्याचं म्हंटलंय. त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली. आम्ही या पोस्टवरील कमेंटस तपासून पाहिल्या. तसच व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च केला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

व्हायरल फोटो कॅप्टन सुमीत कपूर यांचा नाही. हा फोटो साहिल मदान यांचा आहे. साहिल मदान हेही VSR वेंचर्स प्रायव्हेट कंपनीत काही काळ कार्यरत होते. त्यांची पत्नी संजम साहनी यांनी व्हायरल फोटो आपल्या पतीचं असल्याचं सांगितलंय. अपघातावेळी आपले पती विमानात नव्हते. या पोस्टमुळे आम्हाला कठीण परिस्थितीतून जावं लागतंय असही त्यांनी सांगितलंय.

28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान दुर्घनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानाचे पायलट कॅ. सुमीत कपूर यांनाही जीव गमवावा लागला. मात्र आमच्या पडताळणीत सोशल मीडियात कॅ.सुमीत कपूर यांच्या नावाने व्हायरल होत असलेला फोटा त्यांचा असल्याचा दावा असत्य ठरलाय. हो फोटो त्यांचा नसून दुसऱ्या व्यक्तीचा असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे तुम्ही खात्री झाल्याशिवाय अशा पोस्ट व्हायरल करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयकर विभागने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

ठरलं! महाराष्ट्राला उद्या नवीन उपमुख्यमंत्री मिळणार, संध्याकाळी 5 वाजता शपथविधी|VIDEO

विकेंडला प्रवाशांचे हाल होणार; मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

SCROLL FOR NEXT