Ram Murti First Look Saam TV
व्हायरल न्यूज

Ram Murti First Look: प्रभू श्रीराम विराजमान! पाहा डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या रामलल्ला मूर्तीची पहिली झलक

Ruchika Jadhav

Ram Mandir Pooja First Video:

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय नागरिक अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत होते. अशात आज अनेकांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली असून रामलल्ला मंदिरात विराजमान झालेत. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक आता समोर आली आहे.

प्राणप्रतिष्ठावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे. यासाठी त्यांनी शाळीग्राम दगडाचा वापर केला आहे. यापूर्वी १८ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली होती.

आज आभूषण, फुलं आणि तुळशीच्या पानांनी सजवलेली, पिवळी वस्त्रे धारण केलेली रामलल्ला मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. सर्व आभूषणांमध्ये मूर्तीचं रुप आणखी खुलून आलं आहे. मूर्तीची पहिली झलक पाहून भाविकांच्या मनात शांती आणि प्रसन्न भावना निर्माण झालीये.

मूर्तीचं मुख्य वैशिष्य

राम मंदिरात आज ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलीये ते रामलल्ला म्हणजेच प्रभू रामाचं बाल रुप आहे. या मूर्तीचा रंग सावळा आहे. मूर्तीची उंची ५१ इंच इतकी आहे. तर वजन २०० किलो आहे.

रामलल्ला मूर्तीची पहिली झलक पाहण्यासाठी सर्वच भाविकांची आतुरता शिगेला पोहचली होती. मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यावर साऱ्यांनीच मोठा जल्लोष साजरा केला. अयोध्या नगरीसह राज्यात आणि देशात सर्वत्र टाळ, मृदुंग, ढोल ताशा आणि आतिषबाजी करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT