Delhi Metro Video Viral Saam TV
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video Viral: दिल्ली मेट्रोतील सुरेल प्रवास; प्रभू श्रीरामाच्या भेटीची आस, VIDEO व्हायरल

Delhi Metro Shree Ram Song: नागरिकांना राम मंदिराची मोठी ओढ लागलीये. ही ओढ आज दिल्ली मेट्रोमध्ये पाहायला मिळाली. दिल्ली मेट्रोमधील आजवर अनेक अतरंगी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video:

दिल्ली मेट्रोमध्ये आजवर अनेक घटना घडल्या आहेत. येथील अनेक व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. भारतात सध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र यामुळे हर्ष आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. अशात सोशल मीडियावर प्रभू श्री रामाचं गाणं गातानाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणांनी संगीत मैफिलीला सुरुवात केलीय. यातला एक जण गिटार वाजवत आहे. तर दुसरा तरुण श्री रामाच्या दर्शनाला जायचे असल्याचे गाणे गात आहे. हिंदीमध्ये त्याने हे गाणं गायलं आहे. 22 जानेवारी 2024 रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या तारखेची तयारी करा कारण रामाच्या दर्शनाला जायचं आहे, असं गाणं तरुणाने गायलंय.

तरुणाने गायलेल्या गाण्याने पहिल्यांदाच दिल्ली मेट्रोमध्ये भक्तिमय वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं आहे. तरुणाला पाहून मेट्रोने प्रवास करताना संगीताची साथ मिळाल्याने सर्व प्रवाशी देखील खुश झाले. अनेकांनी तरुणाच्या गाण्याचा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये कैद केला. @arjun_bhowmick या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या दिवशी दिवाळी साजरी करावी असे म्हटले आहे. त्यासाठी राज्यात साध्य सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली जातेय. मुंबईत एकूण 10 ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहेत.

नागरिकांना राम मंदिराची मोठी ओढ लागलीये. ही ओढ आज दिल्ली मेट्रोमध्ये पाहायला मिळाली. दिल्ली मेट्रोमधील आजवर अनेक अतरंगी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडीओ अगदी संतापजनक आहेत. कपल रोमान्सपासून ते महिलांच्या हाणामारीपर्यंत सर्वच व्हिडीओ व्हायरल झालेत. मात्र सध्या तरुणाने गायलेल्या गाण्याचा हा व्हिडीओ चांगलाच ट्रेंन्डमध्ये आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT