Karaoke Session By Auto Driver Gets A Thumbs Up From Amit Trivedi Instagram
व्हायरल न्यूज

Auto Driver Sing Song Viral Video: ‘खोया खोया चाँद खुला...’, मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा ड्रायव्हरने दाखवले भन्नाट टॅलेंट; गाणं पाहून सुप्रसिद्ध संगीतकाराने घेतली दखल

Chetan Bodke

Karaoke Session By Auto Driver Gets A Thumbs Up From Amit Trivedi

गेल्या दोन-चार वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक लोकांकडून रात्रंदिवस सोशल मीडियाचा वापर होताना दिसत आहे. जेवढे सोशल मीडियाचे फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य लोकं चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात. असाच एक रिक्षा ड्रायव्हर सोशल मीडियावर आपल्या कलागुणांमुळे चर्चेत आला आहे.

व्हायरल व्हिडीओत, एक ऑटो ड्रायव्हर रिक्षा चालवताना गाणं गाताना दिसत आहे. आणि मुख्य बाब म्हणजे ही व्हिडीओ बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याचे कौतुक सुद्धा त्याने केले आहे. रिक्षाला एका म्युझिक कॉन्सर्टप्रमाणे सजवत, वेगवेगळ्या रंगाच्या लाईटिंगने रिक्षा सजवलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये, तो रिक्षा ड्रायव्हर हातात माईक घेत मोहम्मद रफी यांचं लोकप्रिय गाणं ‘खोया खोया चाँद खुला आसमान’ गाताना दिसत आहे. सध्या ह्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

रिक्षा ड्रायव्हर गात असतानाचा व्हिडीओ संगीतकार अमित त्रिवेदीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शन दिले आहे. तो कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘मुंबईच्या रस्त्यावर एका आवडीचे दर्शन झाले. वांद्रामध्ये रिक्षा चालकाने रिक्षाला पूर्णपणे कॉन्सर्टचा स्टेज बनवला होता, हे पाहून मला खूप आनंद झाला. हा व्हिडीओ पाहून मला जाणवले की, आपल्या देशात टॅलेंटची काही कमतरता नाही. मला या रिक्षा ड्रायव्हरला भेट घेण्याची संधी मिळाली असती तर... पण असो, हा व्हिडीओ पाहून माझा दिवस चांगला गेला. मला आशा आहे की, तुमचा सुद्धा दिवस चांगला जाईल.’ (Social Media)

या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट करत म्हणाले, “खरंच खूप सुंदर टॅलेंट आहे, या टॅलेंटला तोड नाही.” असं एकाने कमेंट केली आहे. तर बाकीचे युजर्स म्हणतात, “रिक्षा ड्रायव्हर खूपच टॅलेंटेड आहे, पण ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यावी.”, “या गायकाला वायरलेस माइक गिफ्ट द्यायला पाहिजे”, “ या व्यक्तीच्या गाण्यामुळे आनंद आणि सकारात्मकता सगळीकडे पसरवत आहे.”, “नोकरी तर चालूच राहिल, फक्त पॅशन सोडू नको. ” असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्या टॅलेंटचे कौतुक केले. (Viral Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT