Happy Birthday Dhanush: दिसण्यावरुन हिणवलं, 'ऑटो ड्रायव्हर' म्हणून चिडवलं, धनुष असा झाला टॉलिवूडचा 'सुपरस्टार'

धनुष आज बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो.
Happy Birthday Dhanush
Happy Birthday DhanushSaam Tv
Published On

South Superstar Dhanush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्यामध्ये धनुषचं नाव घेतलं जाते. टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहीट चित्रपटातून धनुषने त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. धनुषचा 'रांझना' हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेने साऱ्यांचीच मने जिंकली.

Happy Birthday Dhanush
Prabhas Facebook Account Hacked : सुपरस्टार प्रभासचे फेसबुक अकॉउंट हॅक ; विचित्र पोस्टमुळे चाहत्यांसह नेटकऱ्यांनाही झटका

धनुष आज बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. या दाक्षिणात्य अभिनेत्याचा जन्म २८ जुलै १९८३ मध्ये चेन्नई तमिळनाडू येथे झाला. अगदी लहान वयात धनुषने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे. धनुष हा आता ग्लोबल स्टार झाला आहे. धनुषनं त्याच्या मेहनतीनं आणि चिकाटीनं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपली छाप सोडली.

अभिनेता धनुषचे नाव दक्षिणेतील दिग्गज कलाकारांमध्ये घेतले जाते. सुपरस्टार धनुष टॉलीवूडसह बॉलिवूडमधलं एक प्रसिद्ध नाव आहे. अलीकडेच अभिनेता धनुषने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया...(Entertainment Marathi News)

अभिनेता धनुषने केवळ चाहत्यांमध्ये नाही तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींना भूरळ पाडली आहे. सोशल मीडियावर धनुषला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. धनुषची आकर्षक स्टाईल आणि जबरदस्त डायलॉग बोलण्याची शैली यामुळेच तो प्रसिद्ध झाला आहे.

दिसण्यामुळे झाला होता ट्रोल

अभिनेता धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. सुरूवातीला धनुष त्याच्या लूकमुळे लोकांमध्ये चर्चेत होता अनेकांना त्याच्या दिसण्यामुळे त्याची खिल्ली उडवली अलीकडेच अभिनेत्याने, एका मुलाखतीत सांगितले की सुरूवातीला २००३ मध्ये ज्यावेळेस कादल कोंडन सिनेमाचं शुटींग सुरू होतं. तेव्हा सेटवर मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लोक मला ऑटो ड्रायव्हर म्हणून चिडवायचे. तसेच माझी रोज बॉडी शेमिंग केली जायची.

अभिनेता नाही तर शेफ व्हायचे होते

धनुषला शेफ व्हायचं होतं. त्याला जेवण बनवायला प्रचंड आवडतं. अभिनय क्षेत्रात येण्याचा त्याचा विचारही नव्हता. इंडस्ट्रीत येण्याआधी धनुष हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊ इच्छित होता. पण त्याचा जन्मच साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरात झाल्याने तो चित्रपटसृष्टीकडे वळला. २००२ मध्ये धुनषने वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'थुल्लूवधो इलामाई' या चित्रपटातून पदार्पण केल

हॉलीवूडमध्ये पदार्पण

साऊथ आणि बॉलिवूडनंतर धनुषने आता हॉलिवूडमध्येही आपला प्रवास सुरू केला आहे.अलिकडेच अभिनेता धनुषने 'द ग्रे मॅन' या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com