Bhushi Dam Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bhushi Dam Video : भुशी डॅममध्ये ५ जण वाहून गेले; काळजात धडकी भरवणाऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

Bhushi Dam Viral Video : ५ जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. थरारक घटनेचा व्हिडिओ आता साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

Ruchika Jadhav

लोणावळ्यातील भुशी डॅमवर पावसाळ्यात अनेक पर्यकट फिरण्यासाठी येतात. कालच हा डॅम ओव्हर फ्लो झाला. त्यानंतर काही वेळातच येथे ५ जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. थरारक घटनेचा व्हिडिओ आता साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

भुशी डॅमच्या मागच्या बाजूला असलेल्या धबधब्यावर हे पाच जण फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ५ जणांमध्ये ४ मुलांसह एका महिलेचा समावेश आहे. पाण्याचा फ्लो वाढल्यावर तेथून बाहेर पडणं त्यांना कठीण झालं होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे पाचही जण धबधब्यावरील उताराआधी एका खडकावर उडकले आहेत. सर्वांनी एकमेकांना अगदी घट्ट धरून ठेवलं आहे.

मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना फारवेळ तेथे थांबता येत नाही. प्रवाहासोबत ते खाली फेकले जातात. मात्र तरीही काही वेळ या सर्वांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवलेलं दिसत आहे. जसजसे पाणी वाढते तसतसे यातील सर्व जण वेगळे होतात आणि वाहून जातात. सदर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाहून गेलेल्या व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृतदेह सापडले आहेत. तर अद्यापही एकाचा शोध सुरू आहे. भुशी डॅम परिसरात अंसारी कुटुंबातील व्यक्ती फिरण्यासाठी गेले होते. त्यापैकी शाइस्ता अंसारी ( वय 36), अमीना अंसारी (वय 13), उमेरा अंसारी (वय 8), मारिया (वय 4) आणि सैयद (वय 9) यांचा मृतदेह सापडला आहे.

सदर घटनेमुळे अंसारी कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. येथे उपस्थित अन्य व्यक्तींनी ही घटना आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. अंसारी कुटुंबीय येथे फिरण्यासाठी गेले तेव्हा पाणी जास्त नव्हते मात्र नंतर प्रवाह वाढला आन् काळाने त्यांच्यावर झडप घातली. शोधपथकाकडून आता शोध कार्य थांबवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT