Drunk SBI Manager Video Saam TV
व्हायरल न्यूज

Akola News : अरे बापरे! बॅंक मॅनेजर दारूच्या नशेत तर्रर्र; अकोल्यातील धक्कादायक घटना, VIDEO व्हायरल

Drunk SBI Manager Video Viral Akoli Jahangir : अकोल्यामधून एसबीआय बॅंक मॅनेजरचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, मॅनेजर चक्क बॅंकेतच दारू पिवून आला होता.

Rohini Gudaghe

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

अकोल्यामध्ये बॅंक मॅनेजरच दारूच्या नशेत तर्रर्र असल्याचं समोर आलंय. अकोल्यातल्या अकोट तालुक्यात अकोली जहागीर इथल्या स्टेट बँकेचा मॅनेजर चक्क दारू पिऊन बँकेत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बँक मॅनेजर हा ड्युटीवर दारू पिलेल्या अवस्थेत दिसून आला होता, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. बँक मॅनेजर बँकेत दारू पिलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर बँकेत एकच गोंधळ उडाला होता.

बॅंक मॅनेजर दारूच्या नशेत तर्रर्र

अकोली जहागीर येथील ग्रामस्थांनी बँक मॅनेजरविरुद्ध अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती (Akola News) दिलीय. ग्रामीण पोलीस अकोली जहागीर येथील एसबीआय बँकेच्या शाखेत दाखल झाले होते. पोलिसांना बॅंक मॅनेजर दारू प्यायलेल्या अवस्थेत आढळला. तेव्हा दारू प्यायलेला असलेला बँक मॅनेजर प्रफुल ढवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यादरम्यान बँकेसमोर प्रचंड गोंधळ उडाला होता.

अकोल्यातील धक्कादायक घटना

या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत (Drunk SBI Manager Video) आहे. सद्यस्थितीत बँक मॅनेजर प्रफुल ढवरे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत. काल २३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा बँक मॅनेजरचा थरार अकोली जहागीर येथील एसबीआयच्या बँके शाखेत पाहायला मिळाला. दरम्यान बँक मॅनेजरला पोलीस नेत असताना मॅनेजरने विक्टरीचं साईन दाखवल्याचं देखील समोर आलंय. मॅनेजरने हाताचे दोन बोट दाखवत असल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद झालंय.

VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसतंय की, बॅंक मॅनेजर पू्र्णपणे दारूच्या नशेत बुडालेला (Viral News) आहे. बॅंकेच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमलेली आहे. काही पोलिसांनी मॅनेजरला पोलिसांच्या गाडीत बसवलं, तेव्हा मॅनेजरने कॅमेऱ्यासमोर दोन बोटे दाखवली आहेत. या घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली होती. अकोली जहागीर (Viral Video) येथील एसबीआय बॅंकेत ही धक्कादायक घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT