Viral message falsely claims Ajit Pawar earned ₹1100 crore through an AI investment platform; investigation reveals it is a fake website scam. Saam Tv
व्हायरल न्यूज

मृत्यूनंतरही दादांच्या बदनामीचं कारस्थान, 2 वर्षात अजितदादांनी कमवले 1100 कोटी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Fact Check: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची, व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता अजितदादांच्या नावाने मेसेज आणि लिंक पाठवली जातेय...त्यात दादांना एका कंपनीतून 1100 कोटी कमावले असा दावा केलाय...अनेकजण लिंक उघडून पाहतायत...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली..त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

...अजित पवारांनी इन्व्हटैक्स फिनेवॉक या कंपनीच्या माध्यमातून दोन वर्षांत तब्बल 1100 कोटी कमावले असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...दादांच्या निधनानंतर AI आधारीत कंपनीत गुंतवणूक केल्याने त्यांना आता 1100 कोटी मिळाल्याचा दावा केलाय...फेसबुकवरून 'मार्को बेनेव्हेंटो' नावाच्या युजरने इंडियन एक्स्रप्रेसच्या बातमीचा हवाला देत ही पोस्ट शेअर केलीय...त्यामध्ये काय दावा केलाय पाहुयात...

अजित पवारांचं 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला इन्व्हटैक्स फिनेवॉक या एआय-आधारित गुंतवणूक प्लॅटफॉर्मचा वारसा मिळालाय. तब्बल 1100 कोटींचा या कंपनीच्या माध्यमातून फायदा झाल्याचा दावा केलाय...आणि यासोबत बातमीची लिंकही पाठवली जातेय...अजितदादांच्या नावाने ही लिंक शेअर केली जात असल्याने बातमी ्म्हणून अनेकांनी उघडून पाहिलीय...? पण, खरंच अजितदादांनी या कंपनीच्या माध्यमातून 1100 कोटी कमावलेयत का...? या कंपनीत अजितदादांनी गुंतवणूक केलीय का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

अजितदादांची इन्व्हटैक्स फिनेवॉक कंपनीत गुंतवणूक नाही

2 वर्षात दादांना 1100 कोटींचा फायदा झालेला नाही

दादांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचा डाव

दादांच्या नावाने आलेली लिंक उघडून पाहू नका

लिंक उघडून पाहिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते

दादांच्या मृत्यूनंतर बदनामी केली जातेय...ती वेबसाईट अधिकृत 'इंडियन एक्सप्रेस'ची नसून एक बनावट वेबसाइट आहे...लोकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे...महाराष्ट्र DGIPR नेही याबाबत स्पष्टीकरण दिलंय...त्यामुळे आमच्या पडताळणी अजितदादांनी कंपनीच्या माध्यमातून 1100 कोटी कमवल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT