THOUSANDS OF ANACONDAS IN RIVER? VIRAL VIDEO IS FAKE Saam Tv
व्हायरल न्यूज

Amazon River Anaconda: नदीत आढळले हजारो अॅनाकोंडा? अॅनाकोंडांच्या वावरामुळे दहशत?

Fact Check: हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल...नदीच्या किनाऱ्यावर अॅनाकोंडांचा खच पाहायला मिळतोय...नदीत हे अॅनाकोंडा हजारोंच्या संख्येनं असल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे ही नदी कुठली आहे...? एवढ्या मोठ्या प्रमाणात अॅनाकोंडा कुठे आहेत...?

Sandeep Chavan

अॅनाकोंडा हा विषारी नाही, मात्र भक्ष्य मिळताच तो गिळतो...त्यामुळे अॅनाकोंडाची भीती सगळ्यांनाच आहे...अख्खा प्राणीही गिळण्याची ताकद अॅनाकोंडामध्ये असते...त्यामुळे प्राणीही या अॅनाकोंडापासून सावध असतात...आणि हेच अॅनाकोंडा नदीत मोठ्या संख्येनं फिरत असल्याचा दावा केलाय...त्यामुळे ही नदी कुठली आहे...एवढ्या मोठ्या संख्येनं अॅनाकोंडा कुठून आलेत...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, महाराष्ट्रातील नदीत एवढ्या मोठ्या संख्येनं अॅनाकोंडा असतील तर सुरक्षेचा प्रश्न आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने या व्हिडिओची सत्यता जाणून घेतली..

अमेझॉन नदीत हजारो अॅनाकोंडा सापडल्याचा दावा

अमेरिकेच्या अमेझॉन नदीतला हा व्हिडिओ नाही

व्हायरल व्हिडिओ AI च्या माध्यमातून तयार केलाय

लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

सध्या एआयच्या माध्यमातून कोणतेही व्हिडिओ बनवणं शक्य झालंय...त्यामुळे लोक काहीही व्हिडिओ तयार करून व्हायरल करतायत...आमच्या पडताळणीत नदीत हजारोंच्या संख्येनं अॅनाकोंडा सापडल्याचा दावा असत्य ठरलाय...असे व्हिडिओ तुमच्याकडे आल्यास सत्यता पडताळल्याशिवाय शेअर करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT