रस्त्यावर वाहने चालवण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीचे नियम किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देणारी एक घटना पुण्यातून समोर आली आहे. येरवडा येथे सिग्नल तोडून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याने समोरुन येणाऱ्या डंपरला दुचाकीस्वार जोरदार धडकलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नेमकं काय झालं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका चौकात सिग्नल लागला आहे त्यामुळे रस्त्यावर अनेक वाहने थांबली आहेत. परंतू एक डंपर सिग्नल तोडून सरळ येताना व्हिडिओत दिसत आहे. याच दरम्यान एक दुचाकीस्वार डंपर जाऊन धडकतो. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक नेटकऱ्याला नक्कीच धक्का बसेल.
व्हिडिओ पाहिल्यानंतर काही क्षणासाठी नेमकी कोणाची चुक आहे,हे कळत नाही. यात डंपर चालक आणि दुचाकीस्वार दोघेही सिग्नल तोडून जाताना दिसतात. त्यामुळे दोघांच्या चुकीमुळे हा अपघात घडलाय हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील @RoadsOfMumbaiया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,'तुमच्या मते, या अपघातासाठी कोण जबाबदार आहे?' सध्या या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांचे हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळालेत.
व्हिडिओच्या कमेंटस् बॉक्समध्ये एका यूजरने लिहिले आहे की,' भारतात बाइक स्वाराची चूक कधीच नाही' तर आणखी एका यूजरने लिहिलंय की,'सिग्नलवर सर्व वाहने थांबलेले असताना सिग्नल तोडून डंपर चालकाने जायला नको होते'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.