Wedding Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: हे प्रभु हरे राम कृष्ण जगन्नाथ ये क्या ....!थंडीपासून बचावासाठी भर लग्नात मांडली शेकोटी;VIDEO एकदा पहाच

Funny Viral Video: दिवाळीनंतर राज्यभर अनेकांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. अशातच सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यात वऱ्हाडी मंडळी चक्क लग्नातील हॉलमध्ये शेकाटी घेताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding Viral Video

दिवाळीनंतर राज्यभर अनेकांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. सोशल मीडियावर आपल्याला हळदीमध्ये नागीन डान्स करणाऱ्यांपासून ते लग्नातील खरेदीचे व्हायरल व्हिडिओ पाहायल मिळतात. लग्न म्हटलं की अनेक गंमतशीर गोष्टी लग्नात घडत असतात. अशातच सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यात वऱ्हाडी मंडळी चक्क लग्नातील हॉलमध्ये शेकाटी घेताना दिसत आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यभर कडाक्याची थंडी पडलेली आहे. प्रत्येकजण थंडीपासून बचावासाठी अनेक उपाय शोधत असतात. अशातच व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एका लग्न सोहळ्यात स्टेजवर नवरा-नवरीचे विधी सुरू आहेत. नवरा-नवरीच्या बाजूला घरातील काही सदस्य आपल्याला व्हिडिओत दिसत आहेत.

व्हिडिओच्या शेवटी आपण पाहतो की, लग्नात आलेली वऱ्हाडी मंडळीतील काही महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुल शेकोटी घेत आहेत. एका भांड्यात आपल्याला शेकोटी लागलेली दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओहा इन्स्टाग्नामवरील @gouthamkonda_photographyया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'हिवाळी लग्नाचा हंगाम'. हा लग्नातील व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलं नाही. लग्नात असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा गंमतशीर प्रकार कैद केलाय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी पाठवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

SCROLL FOR NEXT