Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लसूण सोलण्याची भन्नाट पद्धत; सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हायरल VIDEO

Video of peeling garlic goes viral: लसूण सोलण्यासाठी आधुनिक उपकरणे, जसे की फळ सोलण्याचे कटर किंवा पीलर, वापरल्यास वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. परंतू लसूण सोलण्याचा बहुतेक जणांना कंटाळा येतो.

Dhanshri Shintre

लसणाचा मसाला डाळींपासून भाज्यांपर्यंत सर्वच पदार्थांची चव वाढवतो आणि मांसाहारी पदार्थांमध्ये लसूण हा एक विशेष घटक आहे. लसूण केवळ चवच नाही तर जेवणाचा सुगंधही वाढवतो, पण लसणाची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते सोलणे, जे एखाद्या कामापेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर लसूण सोलण्याची ही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लसूण सोलण्यासाठी आधुनिक उपकरणे, जसे की फळ सोलण्याचे कटर किंवा पीलर, वापरल्यास वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. सोलण्याआधी थोड्या वेळासाठी पाण्यात भिजवल्यास सोलणे सोपे होते. परंतू लसूण सोलण्याचा बहुतेक जणांना कंटाळा येतो. तसेच काही लोकांना लसूण सोलण्याने हाताच्या बोटांना जळण होते. यासाठी सोशल मीडियावर हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहा. यात अगदी सहजरित्या लसूण सोलताना तुम्ही पाहू शकता.

या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत सर्व प्रथम लसणाचा वरचा कठीण भाग कापून घेतला आणि तो वेगळा करण्यात आला. नंतर तुम्ही पाहू शकता हातात कटर घेऊन त्याची साल अगदी सोप्या पद्धतीने काढली. अशा प्रकारे तुम्ही लसणाची साल अगदी सहज काढू शकाल. साल काढल्यानंतर वरुन लसणाची शेंडी काढून टाका. अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या लसूण सोलू शकता.

सध्या हा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला आहे, मात्र तो व्हिडिओ 'Dr. Sheetal yadav' या अकाउंटवर पाहता येत आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, "Garlic छीलने की ये Technic कमाल की है।, वैसे हम तो कभी नहीं छील पाए ऐसे", असे लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT