Pregnant Women Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अगं हो हो थांब जरा...! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेने माधुरीच्या गाण्यावर केला भन्नाट डान्स; बेबी शॉवरचा VIDEO व्हायरल

Pregnant Women Dance Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गरोदर महिला माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Siddhi Hande

आई होणे हे जगातील सर्वात सुंदर सुख असतं असं म्हणतात. आई आपल्या मुलाला नऊ महिने पोटात वाढवते. या नऊ महिन्याच्या कालावधीत चोर ओटी, डोहाळे जेवण असे कार्यक्रम केले जातात. सध्या सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचा एक वेगळाच ट्रेंड सुरु आहे. आजकाल अगदी धुमधडाक्यात डोहाळे जेवण करतात. या कार्यक्रमात बाळाचे आई-वडिल, आत्या, मावशी, काका सर्वजण डान्स करतात. सध्या असाच एक डोहाळजेवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात गरोदर महिला जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमात बाळाची होणारी आई स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आई माधुरी दीक्षितच्या 'हमको आजकल है इंतज़ार, कोई आए लेके प्यार'या गाण्यावर मस्त डान्स करताना दिसत आहे. ही महिला अगदी सेम टू सेम स्टेप्स करताना दिसत आहे. ती बाळाच्या आगमनासाठी खूप आतुर असल्याचे दिसत आहे.

या महिलेने डोहाळे जेवणासाठी ग्रीन कलरची साडी परिधान केली आहे. त्यावर सुंदर मेकअप आणि फ्लॉवर ज्वेलरी घातली आहे. तिच्या या डान्सचे नेटकऱ्यांनी चांगलेच कौतुक केले आहे. mystry_62_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

SCROLL FOR NEXT