Stunt On Bullet Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: हात सोडले, बंदूक काढली अन्.. चालू गाडीवर तरुणाची थरारक स्टंटबाजी; VIDEO व्हायरल

Stunt On Bullet Viral Video: व्हिडिओत संबंधित तरुण हेल्मेटशिवाय बुलेट चालवत असून सोडून आणि एका हातात बंदूक धरुन धोकादायक स्टंट करत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनीही या तरुणाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

सध्या तरुणाईला रिल्स काढण्याचे, व्हिडिओ बनवण्याचे प्रचंड वेड लागलयं. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठी तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. बऱ्याचदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. त्यामुळेच पोलिसांकडून नेहमी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र तरीही काही हौशी मंडळी अतिउत्साहात नको तेच करतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) तरुणांच्या बाईक स्टंटचे (Bike Stunt Viral Video) अनेक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भरधाव गाडीवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स करण्याचा प्रतापही हे बाईकस्वार करतात. सोशल मीडियावरील व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण हात सोडून आपली बुलेट पळवताना दिसत आहे. इतकेच नव्हेतर तो चालू गाडीवर बंदूक चालवत थरारक स्टंट करताना ही दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओ हा सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहीद पथ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओत संबंधित तरुण हेल्मेटशिवाय बुलेट चालवत असून सोडून आणि एका हातात बंदूक धरुन धोकादायक स्टंट करत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनीही या तरुणाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी अशा स्टंटमुळेच अपघात होत असल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी या तरुणाला कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT