Boy balcony viral video SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: आईची नजर चुकली अन् चिमुकला थेट बाल्कनीच्या टोकावर बसला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

Boy balcony viral video: एका सहाव्या मजल्यावरील इमारतीच्या बाल्कनीवर एक लहान मुलगा बसलेला दिसला. हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या मनात वेगळीच भीती होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गाझियाबादमधील अहिंसाखंडमध्ये घडललेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याठिकाणी असलेल्या एका इमारतीत सहाव्या मजल्यावरील बाल्कनीत बसलेल्या एका मुलाचा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाला. हा मुलगा बाल्कनीच्या ग्रिलवर बसलेला दिसतोय. सुदैवाने, कबुतरांपासून संरक्षणासाठी बाल्कनीत जाळी बसवण्यात आली होती, ज्यामुळे तो खाली पडला नाही.

बाजूच्या बिल्डींगमधील रहिवाशांनी तसंच व्हिडिओ काढणाऱ्या लोकांनी त्याच्या कुटुंबाला सतर्क केलं. यावेळी या लहान मुलाला ग्रिलमधून सुरक्षितपणं वाचवण्यात आलं.

गुरुवारी बाल्कनीच्या ग्रिलवर बसलेल्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ अहिंसाखंडमधील एंजल ज्युपिटर सोसायटीमधील आहे. १७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मुलाला बाल्कनीच्या ग्रिलवरच्या एकदम टोकावर बसलेला दिसतोय.

इंदिरापुरममधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ सुमारे एक आठवडा जुना आहे. सोसायटीमधील एका टॉवरच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील हा मुलगा बाल्कनीच्या ग्रिलवर बसला होता. काही वेळाने कुटुंबातील व्यक्तींनी येऊन त्याला वाचवलं.

जाळीमुळे वाटला लहान मुलगा

सुदैवाने बाल्कनीमध्ये कबुतरांपासून संरक्षण होण्यासाठी जाळी लावण्यात आली होती. ज्यामुळे मुलगा खाली पडला नाही. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खाली असलेले लोकं मुलाला सावध करण्यासाठी ओरडताना दिसतायत. मुलाच्या कुटुंबाला तात्काळ माहिती देण्यात आली आणि त्यांनी बाल्कनीच्या ग्रिलमधून मुलाला वाचवल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

Maharashtra News Live Update: अक्षयतृतीयाला गौराईचे वाजत-गाजत विसर्जन,आदिवासी परंपरा

विदर्भ भाजतोय! अकोला-वर्ध्यात तापमान ४५° पार, उष्णतेचा कहर

कोलकात्यात रिंकू सिंहचं वादळ, KKRने मिळवला पहिला विजय; अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत

Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT