दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा राज्यभरात हजेरी लावली आहे. कालपासून नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नवी मुंबई विमानतळावर पावसाच्या वाढत्या वाढत्या वेगामुळे गुढघाभर पाणी साचले आहे. नुकतेच या विमानतळावर विमान उड्डाणांची यशस्वी चाचणी पार पडली होती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरसाचलेल्या पाण्यामुळे विमान उड्डाणाला सुरु होणार की नाही? याची गंभीर समस्या उपस्थित झाली आहे. शिवाय उड्डाणाच्या आसपास पाणी साचु नये म्हणून आऊटलेट्सची सुविधा सुद्धा अद्याप पाहायला मिळालेली नाही आहे. विमानतळावर पाणी साचणे ही प्रवाशांनसाठी अत्यंत गंभीर बाब आहे. पावसाच्या वाढत्या वेगामुळे अनेक शहरांमध्ये, रस्त्यांवर अनेक रेल्वे रुळावर पाणी साचते.
इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी पुरेसे आउटलेट्स किंवा ड्रेनेज सिस्टीम नाही का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जवळपास ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे काम सुरु असणार आहे. असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच हे विमानतळ सगळ्यात आधुनिक आणि पूर्णपणे सुसज्ज विमानतळ असणार आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणाले, जगातील सर्वात वेगवान 'बॅग क्लेम सिस्टीम' विकसित केले जाणार आहे.
विमानतळ सुरू होण्याआधीच अशा समस्या उघड झाल्यामुळे प्रशासनाने घाईत काम केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विमान उड्डाणे सुरू झाल्यानंतर अशा त्रुटींमुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या, तर त्याचा फटका थेट प्रवासी आणि विमान कंपन्यांना बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.