Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: अरे बापरे...चिमुकल्याने दातांनी उचलल्या ७ विटा, व्हायरल VIDEO पाहून सर्वांनाच धक्का

Viral Video: एका चिमुकल्याने तोंडात सात विटा घेऊन अनोखा पराक्रम करून दाखवला. हा थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यातील दृश्ये पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर अनेक अजब आणि अविश्वसनीय व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे पाहून लोक थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे, ज्यामध्ये एका मुलाने आपल्या दातांनी तब्बल सात विटा उचलण्याचा पराक्रम केला आहे. ज्या विटा हाताने उचलणे कठीण वाटते, त्या त्याने सहज दातांनी उचलल्या, हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. हा अविश्वसनीय पराक्रम पाहून लोक स्तंभित झाले असून, सोशल मीडियावर या चिमुकल्याची प्रचंड चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेकजण अजब पराक्रम करताना दिसतात, पण सध्या एका चिमुकल्याने केलेला पराक्रम वेगळ्याच चर्चेचा विषय ठरला आहे. हा साधा-सुधा प्रकार नाही. त्याच्या ताकदीचा प्रत्यय पाहून लोक थक्क झाले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, त्याच्या अद्भुत क्षमतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. नेमकं काय घडलं आणि त्याने कोणता पराक्रम केला, हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहा.

या व्हिडिओत तो हातांनी नव्हे, तर दातांनी तब्बल सात विटा उचलताना दिसतो. सहसा 4-5 विटा हाताने उचलणेही अवघड असते, पण या मुलाने दातांनी सात विटा उचलून आपल्या तोंडासमोर धरल्या. हा थर एवढा मोठा होता की, त्यामागे त्याचे तोंडही झाकले गेले. हे अद्भुत दृश्य पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करायला सुरुवात केली. मुलाच्या ताकदीची आणि कौशल्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

'@shree_ram_faimly' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा चिमुकल्याचा अविश्वसनीय व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. अनेक युजर्सने त्याच्या या पराक्रमावर कमेंट्स करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले, सुपर टॅलेंट, तर दुसऱ्याने कमेंट केली, खूप छान! मात्र, काहींना याची चिंता वाटली. एका युजरने गंमतीत लिहिले, अरे, अशाने दात तुटतील! हा भन्नाट व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT