Crocodile viral video Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : गावागावात नदीत झुंडीने फिरून हल्ला करणाऱ्या मगरींची दहशत, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? VIDEO

Gujarat viral video : गावागावात नदीत झुंडीने फिरून हल्ला करणाऱ्या मगरींची दहशत पसरली आहे. या मगरीच्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ हा गुजरातच्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Mayuresh Kadav

मुंबई : मगरींचं हे रौद्ररुप पाहून नदीत पाय ठेवायचीही हिंमत होणार नाही. या मगरींनी नद्यांमध्ये दहशत माजवलीय. भक्ष्यक शोधण्यासाठी या मगरी झुंडीने फिरून हल्ला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे? व्हिडिओ आताचा आहे का? की कुणी लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करतंय, असे अनेक सवाल निर्माण होतायत. मात्र, प्रत्येक व्हायरल व्हिडिओची आम्ही खात्री करतो आणि त्याचं सत्य समोर आणतो. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ कुठला आहे याची पडताळणी सुरू केली. मात्र, त्याआधी व्हिडिओसोबत मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये मगरी नद्यांमध्ये फिरून दहशत माजवतायत. झुंडीने फिरणाऱ्या या मगरी अनेक नद्यांमध्ये फिरत असून, भक्षक दिसताच हल्ला करतात. हा व्हिडिओ गुजरातच्या वडोदरामधील आहे.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी केली. व्हायरल व्हिडिओ हा अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. तर काही वेबसाईट, सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेयत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओचा शोध घेण्यासाठी रिसर्च केला. त्यावेळी हा व्हिडिओ कुणी बनवलाय आणि कुठला आहे ते स्पष्ट झालं.

5 मगरींचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. तर व्हायरल मेसेजमध्ये मगरी गुजरातमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. मगरींचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील डॉनी इम्बरलाँगने बनवण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील किम्बर्लीतील

त्यामुळे आमच्या पडताळणीत मगरींचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भारतातील असल्याचा दावा असत्य ठरला. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील असल्याचं समोर आलंय. त्यामुळे असे व्हायरल व्हिडिओ पाहून घाबरून जाऊ नका. कारण, असे व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरवली जाते. मात्र, साम टीव्ही अशा व्हिडिओंची पडताळणी करून सत्यता समोर आणते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

BJP vs TMC Clash : निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हत्यासत्र, भाजप नेत्यासह आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

Accident News: मोठी बातमी! 'प्रभास'च्या क्रू मेंबर्सच्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर

Pune : पोलीस दलात खळबळ! १.५ लाखांची लाच घेताना हवालदाराला रंगेहाथ पकडलं; कारवाईदरम्यान तक्रारदाराच्या छातीचा घेतला चावा

Health care: जेवणानंतर फळे खाणं योग्य आहे का? कोणती फळे ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT