Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: काम, काम आणि फक्त काम... २६ वर्षांत केवळ एकच सुट्टी घेणारे तेजपाल सिंह आहेत तरी कोण?

UP Man: सोशल मीडियावर एका व्यक्तीची प्रचंड चर्चा होतेय,ज्याने २६ वर्षात फक्त कामावर एकदा रजा घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Just One Leave In 26 Years Of Work

आपल्यापैकी प्रत्येजण सुट्टीही हमखास वाट पाहत असतो. सुट्टीचा दिवस येत नाही तो पर्यंत कुंटुबियांसोबत किंवा मित्रांसोबत फिरण्याचा प्लॅन तयार करायला लागतात. शिवाय अजून सुट्टी कशी घेता येईल याचाही विचार करतात. त्यात सोशल मीडियावर एका व्यक्तीची प्रचंड चर्चा होतेय,ज्याने २६ वर्षात फक्त कामावर एकदा रजा घेतली आहे.(Latest Marathi News)

नोकरदार वर्गाला अधिकची ऑफिसमधून रजा मिळणे ही एक समस्या बनली आहे. त्यात ऑफिसच्या कामाचे टेंशन तर कधी बॉसचे. त्यामध्ये काही अधिकची रजा कशी घेता येईल त्यासाठी अनेक कारणे नोकरदार वर्ग सांगत असतो अनेकवेळा आपणही आपल्या कामाच्या ठिकाणी रजा मिळण्यासाठी काही खोटे कारणं दिलंच असेल किंवा सुट्टीचा दिवस कधी येतोय त्याची वाट पाहिलीच असेल. सध्या प्रत्येक ठिकाणी याच व्यक्तीची चर्चा होतेय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्यक्ती उत्तर प्रदेशातील बिजनौर रहिवासी असून तेजपाल सिंग असे त्याचे नाव आहे. २६ डिसेंबर १९९५ रोजीपासून त्यांनी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कंपनीत लिपिक या पदावर कामाची सुरुवात केली होती. त्यांच्या कंपनीत त्यांना वर्षांतून ४५ दिवस सुट्टी घेणे बंधकारक असले तरी त्यांनी त्या ४५ सुट्ट्यांपैकी फक्त एकदा सुट्टी घेतली होती ती म्हणजे त्यांच्या लहान भावाच्या लग्न कार्यासाठी.

रेकॉर्ड...

२६ वर्षांतून फक्त एकदा रजा घेतलेल्या तेजपाल सिंग यांचे नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट केली जाणार आहे. बिजनौर येथे तेजपाल सिंगचे एकत्र कुटुंब आहे. तेजपाल हे वेळेवर कामावर पोहचतात आणि कायमचं वेळेवर कामावरुन घरी जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT