Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

King Cobra Viral Video : अरे बापरे! घराच्या बागेत आढळला तब्बल १२ फुटांचा 'किंग कोब्रा' साप; VIDEO पाहून तुमचेही उडतील होश

Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडिओ सापांसंबधित असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात अनके प्रजातीचे साप आढळून येतात. विविध प्रजातीच्या सापाचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. मात्र जेव्हा आपण कोबरा या महाकाय सापाबद्दल ऐकतो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कोबराहा साप सामान्य सापापेक्षा अधिक लांब तसेच जाड आणि अत्यंत धोकादायक असतो.

तुम्ही फक्त या कल्पना करा की हाच धोकादायक साप(Snake) तुमच्या अंगात किंवा घराबाहेर असलेल्या बागेत आढळला तर?मात्र असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकात आढळून आलेला आहे. कर्नाटकात एक व्यक्ती घराबाहेर पडला असता घराजवळ असलेल्या एका झाडाच्या फांदीवर त्याला एक महाकाय असा कोबरा दिसून येतो. सध्या या कोबराचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेली घटना(Incident) कर्नाटकातील अगुंबे परिसरातील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एका झाडाच्या फांदीला वेटोळे घालून एक महाकाय कोबरा बसलेला आहे. साधारण पाहिले तर हा कोबरा १२ ते १३ फूट लांबीचा असलेला दिसून येतो. परंतू तुम्ही सुरुवातील व्हिडिओ पाहिला तर असे वाटते की एक पाईप झाडाच्या फांदीला लावलेली आहे.

परंतू जसा व्हिडिओ (Video)पुढे जातो आणि तुम्हीही तो नीट पाहता तर शिकारासाठी बसलेला कोबरा तुम्हाला दिसले. त्यानंतर व्हिडिओ दिसते की, वनविभागाच्या काही सहकार्यांच्या मदतीने झाडावर बसलेल्या कोबराला पकडण्यात यश येते. मग वनविभागाने कोबरा या सापाला एका पिशवीत भरतात आणि जंगलात सोडून देतात.

पाहा व्हिडिओ

कोबऱ्याचा संपूर्ण थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Viral) झाला आहे. शिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @ajay_v_giriandmadrascrocbank या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओला तब्बल ५ लाखांहून अधिक यूजर्संचे व्ह्यूज मिळाले आहेत तर बहुतेक नेटकऱ्यांनी कमेंट्सही केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT