तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी
आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी, तुम्ही घराबाहेर एकटे जात असाल तर ही बातमी पाहा. 3 बिबटे भरवस्तीत फिरतात आणि ते कधीही दिसू शकतात असा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. 3 बिबटे फिरत असल्याने माणसांवरही हल्ला करू शकतात, त्यामुळे खरंच बिबटे भरवस्तीत कुठे फिरतायेत. याची आम्ही पडताळणी केली... मग काय सत्य समोर आलं, चला पाहुयात..
बिबट्या हे नावच ऐकून भल्याभल्यांचा थरकाप उडतो. सध्य़ा संभाजीनगरमधे बिबट्या फिरत असल्यानं लोकांमधे दहशत आहे .आणि त्यातच छत्रपती संभाजीनगरात 3-3 बिबटे फिरत असा दावा केल्याने नागरिक दहशतीत आहेत. रात्रीच नव्हे तर दिवसाही घराबाहेर पडण्याआधी स्थानिक बिबट्याच्या भीतीने 10-10 वेळा विचार करतायत. बिबट्या हल्ला करेल अशी भीती मनात निर्माण झाल्याने लोक दहशतीत आहेत.व्हॉट्सअप ग्रूपवर व्हिडीओ वेगाने व्हायरल होतायत. त्यामुळे घराघरात बिबट्याचे व्हिडीओ पोहोचलेयत. यामुळे हा व्हिडिओ खरा आहे का? याची आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली.
हा व्हिडीओ संभाजीनगरातील असल्याने याची माहिती वनविभागाकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी वनविभागाकडून अधिक माहिती जाणून घेतली...
व्हायरल सत्य
संभाजीनगरात 3 बिबट्या फिरतायेत ही अफवा
3 बिबट्या फिरत नसून एकच बिबट्या फिरतोय
बिबट्याला पकडण्यासाठी शहरात पिंजरे लावलेत
बिबट्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवून आहे
त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता, अफवांवर विश्वास ठेवू नये... आपण आपली सुरक्षितता राहील याबाबतची काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलंय. तरीदेखील बिबट्या दिसल्यास तातडीने कळवा असं वनविभागाकडून सांगण्यात आलंय, मात्र संभाजीनगर 3 बिबटे फिरतायत हा दावा आमच्या पडताळणीत खोटा ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.