Viral Satya Video:  Saamtv
viral-satya-news

Viral Video Fact Chek: डासाच्या आकाराचे रोबो सोडतायत व्हायरस? काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य? वाचा...

Viral Satya Video: बिल गेट्स यांच्या नावाने मेसेज व्हायरल करून जेनेटिकली मॉडिफाईड मच्छर सोडल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Fact Chek: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक छोटा कीटक दिसतोय. एका व्यक्तीने हा कीटक हातात धरलाय. हा कीटक जेनेटिकली मॉडिफाईड असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही टेन्शन येईल...खरंच अशा प्रकारचे मच्छर सोडून काही व्हायरस पसरवण्याचा कट आहे का? असे मच्छर बनवून का सोडले जातायत...बिल गेट्स यांच्या नावाने मेसेज व्हायरल करून जेनेटिकली मॉडिफाईड मच्छर सोडल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.

डासाच्या आकाराचे रोबो सोडतायत व्हायरस? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. हा डास आपल्याला चावला तर काही होणार नाही ना? डास चावलाच तर काय होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही इंटरनॅशनल पेपर्स पडताळून पाहिले. त्यावेळी आम्हाला काही रिपोर्ट आढळून आले. त्यामध्ये जी माहिती आम्हाला मिळाली ती वेगळीच होती.

व्हायरल सत्य..

व्हायरल व्हिडिओत दिसत असलेला हा कीटक आहे. जेनेटिकली मॉडिफाईड केलेला डास नाही. व्हिडिओतील किड्याचं नाव यूरोपीय बर्च एफिड आहे. हा कीटक दोन वेगवेगळे रंग धारण करतो. पंखांवर 18 नंबर सारखं दिसतं. कधी कधी या कीटकावर 36 नंबरही दिसतो. मात्र डासमधून कुणीही व्हायरस सोडलेला नाही तर हा एक कीटक असल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईड डासाच्या माध्यमातून व्हायरस पसरवला जातोय हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT