Dahisar News SaamTv
viral-satya-news

Dahisar News : मुंबईत भाजप-ठाकरे गट आमनेसामने; दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये कुटाकुटी! पाहा Video

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभा आणि रॅलीचा जोर वाढला आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आल्याने अनेक भागात राडा होत असल्याचं बघायला मिळत आहे.

Saam Tv

दहिसरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते आमनेसामने आल्याने राडा झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील उमेदवार विनोद गोसाळकर आणि भाजपचे उमेदवार मनीषा चौधरी यांचे कार्यकर्ते रविवारी आमने-सामने आले. यावेळी प्रचारादरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला वेग आला आहे. मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघात रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेतील उमेदवार विनोद गोसाळकर आणि भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी यांच्या प्रचार रॅलीमध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. यावेळी सुरुवातीला झालेल्या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालेलं दिसलं. या घटनेनंतर मनीषा चौधरी आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्याकडून प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रचार दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT