congress workers clash in Chhatrapati Sambhaji Nagar over seat sharing  saam tv
Video

ZP Election : उमेदवारीवरून छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, VIDEO

congress rada sambhajinagar zp elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बार उडाला असून, सुरुवातीलाच तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये राडा झाला आहे. पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

Nandkumar Joshi

डॉ. माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर, साम टीव्ही

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याआधीच तिकीट वाटपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारी देताना पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करून कार्यकर्त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयात संतप्त कार्यकर्त्यांनी राडा केला. पैसे घेऊन तिकीट विकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीवरून फुलंब्रीत कार्यकर्त्यांमध्ये अंसतोष उफाळून आलेला दिसला. तिकीट वाटप करताना डावलल्यानं नाराज झालेल्या काँग्रेस समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या गोटमार यात्रेत अनेक जण गंभीर जखमी

Earthquake: इराणवर निसर्गाचा प्रकोप; युद्धाच्या भडक्यात अणू प्रकल्पांजवळ भूकंप

Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

धुळवडीनंतर धुरळा उडणार; ७ राज्यात निवडणुकीची घोषणा होणार, वाचा सविस्तर

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT