Shruti Vilas Kadam
तांदूळ, पाणी, मीठ आणि जिरे (ऐच्छिक) घ्या.
तांदूळ 2-3 दिवस पाण्यात भिजत ठेवा आणि दररोज पाणी बदला.
भिजवलेले तांदूळ बारीक वाटून गाळून घ्या, म्हणजे गाठी राहणार नाहीत.
कढईत पाणी उकळून त्यात तयार मिश्रण घाला, मीठ टाका आणि सतत हलवत घट्ट पीठ तयार करा.
गरम पीठ कुरडई साच्यात भरून प्लास्टिक शीट किंवा स्वच्छ कापडावर गोल-गोल कुरडया पाडा.
उन्हात 2-3 दिवस कुरडया पूर्णपणे सुकू द्या.
सुकलेल्या कुरडया गरम तेलात तळून कुरकुरीत झाल्यावर सर्व्ह करा.