Sawantwadi School Wall Collapsed Saam TV
Video

School Wall Collapsed : शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; खळबळजनक घटना

Sawantwadi School Wall Collapsed : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली.

Satish Daud

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत एका बाजूने कोसळली आहे. सुदैवाने शाळा बंद असताना ही भिंत कोसळल्याने यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, त्यानंतर या पडलेल्या शाळेतच विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेची भिंत कोसळली. शाळा बंद असताना भिंत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

मागील काही दिवसांपासून या शाळेच्या भिंतीला तडे गेले होते. ही बाब स्थानिकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. धोकादायक इमारतीतच विद्यार्थ्यांना बसवलं जात होतं.

मात्र, शाळा बंद असताना अचानक या शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्याने काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

SCROLL FOR NEXT