NCP (AP) SaamTv
Video

VIDEO : अजित पवारांचं इनकमिंग जोरदार; झिशान सीद्दिकी, संजयकाका पाटील, निशिकांत पाटील यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश

Ajit Pawar Group : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज अनेक बड्या नेत्यांचा आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होत आहे.

Saam Tv

अजित पवार यांच्या गटात आज जोरदार इनकमिंग होत आहे. बाबा सीद्दिकी यांचे पुत्र झिशान सीद्दिकी यांचा आज अजित पवार यांच्या गटात पक्ष प्रवेश होणार आहे. कॉंग्रेसमधून ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. याच बरोबर संजयकाका पाटील आणि निशिकांत पाटील यांचा देखील आज पक्ष प्रवेश झाला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सदाभाऊ खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज भारतीय जनता पक्षाचे नेते तथा सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील हे तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे. तर बाबा सीद्दिकी यांचे पुत्र झिशान सीद्दिकी यांनी देखील आज अजित पवार गटात प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने नाशिकमध्ये अजित पवार यांना फायदा होण्याची शक्यता आहे. निशिकांत पाटील यांनी देखील आज अजितदादांच्या गटात प्रवेश केल्याने आता या सगळ्या नेत्यांच्या इनकमिंगचा नेमका कसा फायदा अजित पवार यांना होईल हे पाहाणं आगामी काळात महत्वाचं ठरेल.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT