Ajit Pawar vs Devendra Fadnavis saam tv
Video

होय, मी बाजीरावच! अजित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर, VIDEO

Ajit Pawar vs Devendra Fadnavis : पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने आले आहेत. फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Nandkumar Joshi

पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. दुसरीकडं या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात महायुती सरकारमध्ये एकत्र असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू झालं. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका-प्रतिटीका करत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने आले आहेत. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनावर 'खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा', असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

“होय, मी बाजीरावच आहे,” असं अजित पवार म्हणाले. मेट्रो आणि बस प्रवास मोफत हा पुणेकरांचा हक्क असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, असा टोला फडणवीसांची अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनानंतर लगावला होता. त्याला अजित पवारांनी थेट उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केलीय. या जुगलबंदीमुळे पुण्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT