Citizens catch and assault a Shinde Sena worker in Yeola after he was allegedly found distributing cash near a polling station. saam tv
Video

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Controversy in Yeola: येवला येथील मतदान केंद्राजवळ शिंदे सेनेच्या एका कार्यकर्त्याला पैसे वाटप करत असताना पकडण्यात आलंय. नागरिकांनी त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे राज्यभर राजकीय वाद झाला.

Bharat Jadhav

  • येवला येथे मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्याला नागरिकांनी पकडलं.

  • शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला चोपलं.

  • निवडणूक गैरप्रकारांच्या तक्रारी

नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचारसंहितेचा सर्रास भंग केलाय. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या आहेत. आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ‘पैसा फेक तमाशा देख’, वगनाट्य रंगले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय. अनेक ठिकाणी बोगस मतदार सापडले तर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचे प्रकार उघडकीस आलेत.

येवला येथेही नगराध्यक्ष झालेल्या मतदानावेळी पैसे वाटप झाल्याचा प्रकार उघडकीस आला. येथे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपेश दराडे यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत होते. तेथील लोकांनी दराडे यांच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर मतदान केंद्राच्या जवळच त्याला लोकांनी चांगलाच चोप दिला. नागरिकांनी चोप देत कार्यकर्त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

SCROLL FOR NEXT