Yavatmal tractor welding blast kills two people : यवतमाळमधील उमरखेडमध्ये ट्रॅक्टरला वेल्डिंग करताना अचानक स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उमरखेडमधील एका वेल्डिंग वर्कशॉपजवळ ही घटना घडली आहे. ट्रॅक्टरला वेल्डिंग करताना स्फोट झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. स्फोटामुळे शहरातील दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली होती. स्फोट झाला त्यावेळी तेथून जाणाऱ्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. त्या वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेतील जखमींना उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.