Writer Tara Bhavalkar SaamTv
Video

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Saam Tv

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

यंदा दिल्लीत पार पडणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९८ वे संमेलन असणार आहे. तारा भवाळकर या लोक संस्कृतीच्या अभ्यासक आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी तारा भवाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे. त्या 98 वर्षातल्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. गेल्या वर्षी लेखिका अरुणा ढेरे या पाचव्या अध्यक्ष होत्या. संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी आधी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली झाली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात झाली. त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम, ग्रंथ दालन, ग्रंथ आदी विषयांवर चर्चा झाली. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावावर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT