Flying Car race in the Sky/Social media saam tv
Video

बघा, आकाशात उडणारी कार; शर्यतीचा थरारही रंगला | VIDEO

World's first flying Race Car : आकाशात कार शर्यतीचा थरार बघायला मिळाला. उडणाऱ्या कारचा थरार आकाशात पहिल्यांदाच बघायला मिळाला. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

विज्ञानकथांमधूनच पाहायला, वाचायला आणि ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्या आहेत. आकाशात कार उडतील आणि आकाशातही थरार बघायला मिळेल, हे फक्त आपण इमॅजिनच केलं आहे. पण खरंच आकाशात कार उडल्या तर?.... कसली धम्माल ना.. जमिनीवर पायच ठेवणार नाही कुणी. सगळेच आकाशातून प्रवास करतील. ट्रॅफिकचीही कटकट नाही. याशिवाय काही तासांचं अंतर काही मिनिटांतच पार करता येईल. हो ना...आता ही फक्त कल्पनाशक्ती नाही. तर प्रत्यक्षात कार आकाशात उडाल्या आहेत.

अमेरिकेतील टेक्सास राज्यात जेस्टन एअर गेम्समध्ये प्रथमच उडणाऱ्या कारची शर्यत घेण्यात आली. ‘आकाशातील फॉर्म्युला वन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या रेसमध्ये जेस्टन वन नावाच्या वैयक्तिक इलेक्ट्रिक एअरक्राफ्टचा वापर करण्यात आला आहे. रेसदरम्यान चार पायलटांनी हवेतच बनवलेल्या ट्रॅकवर एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. ही शर्यत भविष्यातील अशा स्पर्धांचा आराखडा दाखवण्यासाठी आयोजित केल्याचे कंपनीने सांगितलं आहे. कंपनीचे सहसंस्थापक तोमाझ पाटन यांनी देखील या रेसमध्ये भाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

Asrani: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे पूर्ण नाव माहितीये का?

SCROLL FOR NEXT