Supriya Sule Saam tv
Video

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या माझ्यावर अन्याय....

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार का? या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. २०१४ पासून माध्यमांमध्ये माझा शपथविधी होत आहे, माझ्यावर असा अन्याय करू नका, असे त्या म्हणाल्या.

Namdeo Kumbhar

मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदाच्या सतत रंगणाऱ्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ पासून म्हणजेच गेली १२ वर्षे माध्यमांमध्ये माझा शपथविधी होत आहे, माझ्यावर असा अन्याय करू नका, असे म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर उत्तर दिले. तसेच राजकीय चर्चांपेक्षा संसदेतील कामकाजावर कोणी प्रश्न विचारत नसल्याची त्या म्हणाल्या. ज्या धोरणनिर्मितीसाठी (पॉलिसी मेकिंग) मी संसदेत निवडून गेले आहे, त्याबद्दल कोणीही गांभीर्याने विचारत नाही, याचे मला एकाच गोष्टीचे दुःख वाटते, असेही ते म्हणाले.

सध्या मी चार संयुक्त संसदीय समित्यांवर (JPC) आणि देशाच्या महत्त्वाच्या फायनान्स कमिटीवर काम करत आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळत असताना त्या कामाबद्दल जर कोणी एखादा प्रश्न विचारला, तर मला मनापासून आनंद होईल, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझ्याशी संबंध चांगले ठेवा...' शिंदे सेनेच्या आमदाराच्या कथित कॉल रेकॉर्डिंगने जुन्नरमध्ये खळबळ

Diabetes : डायबिटीज असतानाही १०० वर्षे जगता येतं! फक्त 'ABCD' मंत्र पाळा; काय आहे हा फॉर्म्युला?

Indian Railways : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर! वंदे भारतमध्ये मिळणार खास सरप्राईज

Hot Tea Health Risks: गरम-गरम चहा प्यायल्याने होतो कॅन्सर? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

25 कोटींचा प्रस्ताव, 5 कोटींची मागणी अन् ऑडिओ क्लिप! शिरसाटांचा संजय राऊतांना इशारा

SCROLL FOR NEXT